टाकळी हाजी सोसायटीच्या अध्यक्षपदी घोडे तर उपाध्यक्षपदी लोखंडे यांची निवड

276

शिरूर,पुणे : देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावच्या विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नुकतीच बन्सीशेठ बबनराव घोडे यांची तर उपाध्यक्षपदी साहेबराव नामदेव लोखंडे यांची निवड झाली.
सोमवार दि.३ ला पार पडलेल्या निवडणूकीत अध्यक्ष पदासाठी एकमेव बन्सीशेठ घोडे यांचा अर्ज आला, तर उपाध्यक्ष पदासाठी साहेबराव लोखंडे व सुभाष गावडे यांनी अर्ज दाखल केले होते.यावेळी झालेल्या निवडणूकीत साहेबराव लोखंडे यांना आठ तर सुभाष गावडे यांना पाच मते मिळाली.टाकळी हाजी चे माजी आदर्श सरपंच दामुअण्णा घोडे यांच्या विचारांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष यांची निवड झाल्याने विजयी उमेदवारांची आणि संचालकांची त्यांनी विजयी मिरवणूक काढून सर्वांचे अभिनंदन केले. या निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी म्हणून दिपक वराळ यांनी काम पाहिले. यावेळी टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, गावच्या कार्यक्षम सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, मच्छिंद्र भाकरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पाराभाऊ गावडे, माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे, म्हसे गावचे सरपंच सौरव पवार, उद्योजक रामभाऊ गायकवाड, राहुल घोडे, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *