टाकळी हाजी येथील साधना गावडे यांचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्काराने गौरव 

198

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी च्या टेमकरवस्ती येथील अंगणवाडी मदतनीस साधना गावडे यांना नुकतेच पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
टेमकरवस्ती अंगणवाडीच्या सेविका सेवानिवृत्त झाल्यानंतर साधना गावडे यांनी स्वतः अनेक महिन्यांपासून अंगणवाडीची सर्व जबाबदारी सक्षमपणे सांभाळली.यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा परिषद पुणे यांजकडून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
साधना गावडे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल टाकळी हाजी च्या कार्यक्षम सरपंच अरुणाताई घोडे, टेमकरवस्ती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विकास उचाळे, उपशिक्षक गहिनीनाथ सानप, सेवानिवृत्त सेविका जुलेखा सय्यद, कल्पना सदाफुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव लोखंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *