इनामगाव,शिरूर : संत मुकीदंदास व श्री संत अनंतगोपाल स्वामी महाराज पालखी सोहळयाचे प्रस्थान,वारक-यांना रेनकोट वाटप

918
       इनामगाव,शिरूर : शिरूर तालुक्यातील इनामगावच्या संत मुकीदंदास व श्री संत अनंतगोपाल स्वामी महाराज पालखी सोहळयाचे प्रस्थान भक्तिमय व प्रसन्न वातावरणात पार पडले. दिंडी व वारीत सहभागी वारक-यांना यावेळी  रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे, प्रसिद्ध सेंद्रिय शेती तज्ञ दिलीप पेंडसे, शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भगवान राव शेळके, शिरूर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गदादे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे, भाजप शिरूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र भुजबळ,शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे,सिद्धेश्वर नांद्रे,गोरक्ष काळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
         यावेळी इनामगाव येथून टाळ – मृदूंगाच्या साथीत व वैष्णव पताका उंचावत, हरिनामाचा गजर करीत हा पायी दिनी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *