कवठे बीट मधील अंगणवाडी सेविका,मदतनीस यांची आरोग्य तपासणी 

448
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई बीट मध्ये कार्यरत असणाऱ्या ५५ सेविका,मदतनीस यांची काल दि. १२ ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी,औषोधोपचार व स्व आरोग्याविषयी घ्यावयाची महत्वपूर्ण काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिरसाट यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
      आजादी का अमृतमहोत्सव व रक्षाबंधन चे निमित्त साधून अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीराचे कवठे येमाई आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे यांनी दिली.तर लवकरच परिसरात कार्यरत असणाऱ्या आशा सेविका,अर्धवेळ स्त्री परिचर यांची ही आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. शिरसाट यांनी सांगितले.
        कवठे बीट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ५५ अंगणवाडी,मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांची पूर्ण रक्त तपासणी,गणना,द्वारे/पॅप स्मीअर,क्लिनिकल स्तन परीक्षा,रक्तदाब निर्धारण,लिपिड प्रोफाइल,मूत्र विश्लेषण,रक्तातील साखरेची पातळी इत्यादी तपासण्या करण्यात आल्याचे डॉ.शिरसाट म्हणाले.ज्या अंगणवाडी कर्मचारयांना पुढील उपचाराची किंवा संदर्भ सेवेची आवश्यकता असेल त्यांना औंध रुग्णालय ससून सर्वोपचार रुग्णालय,बी.जे.शासकीय रुग्णालय पुणे येथे पाठविण्यात येईल.
        जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आरोग्य तपासणी शिबीरास बहुसंख्य अंगणवाडी,मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होत्या.स्थानिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मयूर नरवडे,शिरूर महालॅब चे सिद्धार्थ भदे,स्थानिक आरोग्य कर्मचारी,सेवक उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *