शाळेप्रती कृतज्ञता – पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चातून बांधून दिली सव्वा दोन लाख रुपयांची विहीर – कवठे हायस्कुलचे माजी विद्यार्थी मधुकर खोल्लम यांचा विधायक उपक्रम 

403
                   शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – ज्या शाळेत शिकून आपण मोठे झालो,प्रगतीपथावर आलो त्या शाळेप्रती सदभावना,कृतज्ञता व्यक्त करताना अनेक माजी विद्यार्थी आपल्या शाळेला विविध रूपाने मदतीचा हात देताना पहावयास मिळतात.असेच एक उत्तम व आदर्शवत उदाहरण शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षण घेतलेले शाळेचे माजी विद्यार्थी मधुकर प्रभाकर खोल्लम यांनी इतरांपुढे ठेवले आहे.
                   इयत्ता ५ वी ते १० वि पर्यंत येथिल हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेले खोल्लम पुण्यात लेखा परीक्षक व आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.या कामी त्यांची पत्नी मेघा मधुकर खोल्लम यांचा ही मोठा सहयोग त्यांना मिळत आहे.न्यू इंग्लिश स्कुल कवठे येमाई मधील विद्यार्थ्यांना सातत्याने जाणवत असलेली पिण्याच्या पाण्याची महत्वाची अडचण लक्षात घेत खोल्लम दाम्पत्याने संकल्प करीत शाळेसाठी २५ फूट खोली असलेली विहीर बांधून दिली.यामुळे न्यू इंग्लिश स्कूल कवठे या विद्यालयालयातील मुलांच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपीची समस्या सुटणार आहे. याकामी सव्वा दोन लाख रुपये खर्च आला असून हा सर्व खर्च खोल्लम पती पत्नीने केला. हायस्कुल शाळेसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून खोदलेल्या व संरक्षित बांधकाम केलेल्या या पाणीपुरवठा विहिरीचा लोकार्पण सोहळा १५ ऑगस्टला होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोपानराव वागदरे यांनी सा.समाजशिल शी बोलताना दिली.

                  मधुकर खोल्लम यांनी आपल्या आई  स्व. माणिक बाई प्रभाकर खोल्लम व स्व.प्रभाकर विश्वनाथ खोल्लम यांचे स्मरणार्थ ही विहीर बांधून दिली असून त्यांच्या या उपक्रमाचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,रयत शिक्षण संस्थेचे पुणे विभागीय अधिकारी प्राचार्य किसनराव रत्नपारखी, शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच सुनीताताई बबनराव पोकळे, येथील हायस्कुलचे प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे,अविनाश पोकळे,विलासराव रोहिले,सोपानराव वागदरे शाळेचे अनेक माजी विद्यार्थी,ग्रामस्थ यांनी कौतुक करीत खोल्लम दांपत्याचे अभिनंदन केले आहे. 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *