शिरूर संवादिनी गटामार्फत सार्थ प्रतिज्ञा उपक्रम – आमदाबादच्या पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न 

370
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील आमदाबादच्या पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालयात नुकताच शिरूर संवादिनी गटामार्फत सार्थ प्रतिज्ञा उपक्रम संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती प्रकाश थोरात यांनी दिली.
           आमदाबाद येथील मा.पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय शाळेत ज्ञान प्रबोधिनी अंतर्गत शिरूर संवादिनी गटातर्फे नुकताच सार्थ प्रतिज्ञा उपक्रम संपन्न झाला.या गटामार्फत नेहमीच समाजोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रम घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून या  टीमने आमदाबाद विद्यालयात येऊन भारतीय मराठी प्रतिज्ञेच्या प्रत्येक ओळीतील शब्दांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजेल अशा सुंदर पद्धतीने समजावून सांगितला.दैनंदिन परिपाठात शाळेत विद्यार्थी रोज प्रतिज्ञा म्हणतात. परंतु त्याचा परिपूर्ण अर्थ विद्यार्थी लक्षात घेत नाहीत. विद्यार्थ्यांना आपल्या परीपाठातील प्रतिज्ञेचा अर्थ समजावून सांगण्याचा शिरूर संवादिनीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमासाठी डॉ.सोनालीताई हार्दे, डॉ.विद्या शिंदे, संगीताताई,मीना भाभी, मेघा ताई यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिज्ञेचा अर्थ समजावून सांगितला.शेवटी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *