कवठे येमाईत हनुमान जयंती उत्सव, श्री येमाई देवी पालखी सोहळा,यात्रा उत्साहात संपन्न 

513
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे यमाई चे ग्रामदैवत श्री यमाई देवीचा पालखी सोहळा, यात्रा व हनुमान जयंती उत्सव,बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री यमाई मातेचे दर्शन घेत यात्रा उत्सवात सहभाग घेतला.
  काल दि. सहा ला सकाळी गावठाणातील ऐतिहासिक श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर नंतर सकाळी नऊला ग्रामदैवत श्री यमाई देवी चा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी महिला भाविक ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांसाठी थंड पाण्याची व सरबत व्यवस्था माजी सरपंच दीपक भाऊ रत्नपारखी, गणेश रत्नपारखी यांनी ठेवली होती.  दरम्यान श्री यमाई देवी मंदिरा नजीक असणाऱ्या घाटामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून बैलगाड्यांच्या शर्यतींना प्रारंभ करण्यात आला या शर्यती सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होत्या.पहिल्या क्रमांकामध्ये पांडुरंग किसन काळे व राजाराम नारायण साबळे यांचा गाडा पहिल्या क्रमांकात फळीफोड गाड्या ठरला तर दुसऱ्या क्रमांका मध्ये बन्सी बबनराव घोडे व लक्ष्मण पिराजी जाधव कवठे यमाई यांचा गाडा दुसऱ्या क्रमांकाच्या फळीफोड गाड्यात पात्र ठरला.  तर तिसऱ्या क्रमांकाच्या फळीफोड गाड्यात बाजीराव भागाजी मुंजाळ व देवांश राजेंद्र गावडे यांचा गाडा तिसरा क्रमांकाचा ठरला.  बैलगाड्यांच्या पूर्ण शर्यतीत गव्हाणवाडीचे पांडुरंग काळे यांचा प्रथम क्रमांक, राजाराम साबळे यांचा द्वितीय क्रमांक तर कवठे येमाई चे लक्ष्मण जाधव यांचा गाडा तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यती च्या दरम्यान शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरी शिरूर पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे व मान्यवरांनी भेट दिली. यात्रा व बैलगाडा शर्यत शांततेत पार पडल्याची माहिती माजी सरपंच सुनीता बबनराव पोकळे  व यात्रा कमिटीने दिली. काल दि. ०६ ला  रात्री श्री यमाई देवी मंदिरा नजीक तमाशाचा कार्यक्रम शांततेत पार पडला असून आज सायंकाळी कुस्त्यांचा जंगी आखाडा व रात्री गावठाणातील श्री यमाई देवी चौकात तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अविनाश बबनराव पोकळे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *