लेखी आश्वासना नंतर साबळे यांनी उपोषण सोडले – साबळेवाडीतील अतिक्रमण प्रकरण 

924
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीच्या साबळेवाडी येथील गावठाण जमीनी वरील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून उपोषणास बसलेले संतोष उर्फ मकरंद साबळे यांना सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप व ग्रामपंचायत प्रशासनाने दहा दिवसात अतिक्रमण काढण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर काल चौथ्या दिवशी दुपारनंतर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते ज्युस घेऊन संतोष साबळे यांनी उपोषण सोडले.
साबळेवाडी येथील गावठाण जमीनीत सहा एकर क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे.तसेच जुने घरे,रस्ते, स्मशानभुमी परीसरात अतिक्रमण झालेले आहे. येथील गावठाण जागेत कांदा चाळीसह डांळीब कांदा व इतर शेतमालाचे उत्पादन घेतले जात आहे. हे अतिक्रमण ऐवढे आहे की एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास स्मशान भुमीकडे जायला सुद्धा रस्ता या लोकांनी ठेवलेला दिसत नाही. हे अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी संतोष उर्फ मकरंद मोहन साबळे मागील चार दिवसापासुन टाकळी हाजी ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने दहा दिवसात अतिक्रमण काढण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर काल चौथ्या दिवशी दुपारनंतर साबळे यांनी उपोषण सोडले.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक दिलीप सोदक, बाजार समितीचे माजी संचालक सावित्रा थोरात, सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र खराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
–  ” आगामी दहा दिवसात ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासना प्रमाणे अतिक्रमण हटविण्यात आले पाहीजे अन्यथा या प्रश्नी पुन्हा उपोषण करण्यात येईल.
– संतोष उर्फ मकरंद साबळे – उपोषण कर्ते 
”  ग्रामपंचायत प्रशासनाने आजच साबळेवाडी येथील गावठाणात झालेले अतिक्रम हटविण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली असून जवळपास ८० टक्के काम पूर्ण केले असून लवकरच येथील पूर्ण अतिक्रमण हटविण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रयत्न राहील.”
– राजेंद्र खराडे – ग्रामविकास अधिकारी,टाकळी हाजी 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *