प्रा. लालचंद संते यांना पि.एच.डी. प्रदान

270

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : जनसेवा शिक्षण मंडळाचे शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे. येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. लालचंद संते यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी संपादन केली आहे  “ठाणे जिल्ह्यातील ठाकूर आणि कातकरी जमातींचा आर्थिक व सामाजिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांनी कै. बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली येथील  डॉ.बी.एस.सावके सर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या विषयाचा फायदा ठाकूर आणि कातकरी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी होणार आहे. प्रा.संते यांचे अभिनंदन करतांना जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गोटिराम  पवार म्हटले की, ‘ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना किंबहुना ठाणे जिल्ह्यातील सर्वांना  या संशोधनाचा फायदा होणार आहे.’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर.विशे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *