शिक्रापूर येथे कपड्याच्या दुकानाला आग

198

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील एस.टी. स्टॅन्ड चौकात वामा कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागून अंदाजे एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. शिक्रापूर येथे चाकण चौकात एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. शिवाजी धुमाळ यांना दुकानातुन धुर येत असल्याचे जाणवले. पुणे प्रधिकरण अग्नीशामक दलाचे विजय महाजन, नितीन माने, फायरमन प्रशांत अडसूळ, मयुर गोसावी, अक्षय नेवसे, सचिन गवळी  अन्य जणानी घटना स्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक झाले असून, अंदाजे दीड कोटीचे नुकसान झाले आहे. तरी आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *