शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :स्थानिक स्वराज्य संस्थांनचे नुतन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. गांव पातळीवर नेतृत्वाची संधी मिळावी म्हणुन कै यशवंतराव चव्हाण यांनी दुरदृष्टी कोनातुन स्थानिक स्वराज्य संस्थांनची १ मे १९६२ रोजी निर्मिती केली. त्यास कै.राजीव गांधी यांनी ग्रामसभांना सर्व अधिकार देऊन अधिक बळकटी दिली. त्यात ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायती निर्माण झाल्या. त्यामुळे गावच्या विकासाला एक सुवर्ण संधी मिळाली. त्यात आमलाग्र बदल होत जाऊन विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतीस मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध झाला व गावचा चेहरामोहरा बदलू लागला. त्यात गावच्या नागरीकांनी कर्तव्याबरोबर हक्काची जाणीव ठेऊन आपली घरपही भरणा करुन उत्पन्नात भर पाडणेस मदत केल्यास नक्कीच त्यात आणखी भर पडेल. विविध योजनांनअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीचा ग्रामसभेत विकासाचा आराखडा तयार करण्यास नागरीकांनी मदत केल्यास निश्चीतच सर्व प्रभागांना व लाभार्थीना त्याचा समान फायदा होईल. राजकारण बाजुला ठेऊन गाव माझा मी गावाचा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन एक सुंदर गाव करण्याचा मनोदय केल्यास नक्कीच आदर्श ग्रामपंचायती होण्यास फार मोठी मदत होईल. यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेस हजर राहून आपले गावाच्या हीतासाठी प्रश्न मांडून ते सोडवून घेतल्यास खेड्याकडे चला हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पुर्णत्वास नेणेकामी मदत केल्याचे समाधान मिळेल.
– श्रीकांत ढमढेरे, माजी विस्तारधिकारी