130 फूट उंच ध्वज स्तंभावरील ध्वज पुन्हा पूर्ववत

282

 तिरंग्याचा आकार कमी केल्याने नागरिकांमध्ये  नाराजी

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्याची व मुरबाड शहरातली राष्ट्रिय महामार्ग क्रमांक 61वर तीन हात नाका येथे 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून स्थानीक आमदार किसन कथोरे यांच्या स्थानीक विकास निधी सन 2023/24 अंतर्गत 10 लाख युद्ध पातळीवर उभारून 130 फूट ऊंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला. या ध्वज स्तंभावर 30फूट रुंदी व 45फूट लांबी असलेला ध्वज तालुक्यातील वयाने शतक पार केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून 1 मे रोजी लोकार्पण करण्यात आले. यामुळें राष्ट्रिय महामार्गावर व शहरातली तीन हात नाक्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले होते. मात्र मागील आठवड्यात अचानक हा ध्वज कढण्यात आला व याची सर्वत्र चर्चा सुरू असताना मुरबाड नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग टोलवाटोलवी करत उत्तरे देऊ लागले. यामुळें नागरिकांच्या मनात प्रंचड नाराजी असताना काल 12जून रोजी पुन्हा या ध्वज स्तंभावर 30 फूट रुंदी व 45 फूट लांब ध्वज स्तंभ लावण्या एवजी लहान आकाराचा ध्वज लावल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे. आमदार किसन कथोरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे 1मे रोजी स्मारकाचा ध्वज उभारला. ह्या ध्वज स्तंभाचे काम डी के फाऊंडेशन चे डॉ राकेश बक्षी यांनी युद्ध पातळीवर केले. मात्र दोन महिने उलटण्या पूर्वीच राष्ट्रिय ध्वज बदलण्याची वेळ आली. त्यातही नवा राष्ट्रीय ध्वज लहान आकाराचा असल्याने याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे. तसेच ध्वज स्तंभावर ठरल्या प्रमाणे 30 फूट रुंदी व 45फूट लांब ध्वज पूर्ववत लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *