आ.नाना पटोले यांच्या जन्मदिनानिमित्ताने १०० फुटी ग्रास पेटींग

209
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतुन व जिल्हाधक्ष श्री.दयानंद चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या जन्मदिनानिमित्ताने ५ जुन २०२३ रोजी शेतामध्ये बी पेरण्यात आले  होते. त्यानंतर योग्य मशागतीनंतर कलाकार नंदु शिंदे यांनी १०० फुटी ग्रास पेटींग काढुन अनोख्या पध्दतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल मुरबाड तालुक्यात कुतुहलाचा विषय बनला आहे. आ.नाना पटोले हे देशातील शेतकऱ्यांचे अग्रगण्य नेतृत्व असुन, महाराष्ट्र राज्याचे भविष्यातील आशास्थान आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कमिटी व शेतकरी बांधवांच्यावतीने वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा देण्यात याव्या म्हणुन ग्रासपेंटींगच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.
आंबेळे गावातील जेष्ठ महिला सौ. गुंगुबाई पवार यांनी सदरचे ग्रासपेंटीग बघितल्यानंतर माझ्या ६५ वर्षाच्या आयुष्यात पहिल्यादांच इतकी मोठी कलाकृती पहाण्यात आल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथमच उदीडाच्या बीयांच्या साहाय्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचे ग्रासपेटींग करण्याची संकल्पना माझ्यासमोर ठेवण्यात आली व मला त्यामाध्यमातुन काम करण्यासाठी  संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोजकांचे  कलाकार नंदु शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
मुरबाड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह पवार हे अनोख्या उपक्रमाचे संकल्पक असुन योग्य पध्दतीने आपल्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे त्यांना ठाऊक आहे. तसेच त्यांनी जबाबदारी घेतल्यापासुन पक्षाची संघटना व पक्षामागील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे चित्र तालुक्यात दिसत असल्याचे प्रतिपादन दयानंद चोरघे यांनी केले. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी किसान कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस श्री.जयवंत पवार, श्री.गणेश हरणे, श्री.अरुण गायकवाड, श्री.प्रकाश पवार, श्री.शिवाजी पवार, श्री.राहुल पवार, श्री.स्वप्निल जाधव, कु.अजय पवार, कु.प्रणव पवार आदींनी मेहनत घेतली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *