भाजपा मोदी@9 कल्याण येथील जाहिर सभेतील आमदार किसन कथोरे यांच्या अनुपस्थिती मुळे गटबाजीच्या चर्चांना उधाण ?

481

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पुर्ण झाल्याने कल्याण मधील फडके मैदानात मोदी @9जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्यांचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप चे राष्ट्रिय सरचिटणीस सी टी रविजी हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.या सभेचे आयोजन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांनी केलें होतें. या सभेला मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, या मतदार संघातील जिल्हा परिषद गटा नुसार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवीजी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, नरेंद्र पवार या सारखे मान्यवर उपस्थित असताना मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला आहे. मधल्या काळात भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी या दोघांमध्ये समन्वय साधून गटबाजी संपवल्याचे चित्र तयार झाले होते. मात्र काही स्थानिक कार्यक्रमात ही गटबाजी चव्हाट्यावर आली होती. सध्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत आमदार किसन कथोरे मुरबाड तालुक्यात शासकिय जत्रा माध्यमातून संपर्क साधत असताना कल्याण मधील फडके मैदानात झालेल्या जाहीर जन सभेतील त्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला असून, दोघांमधील राजकीय वाद शिगेला पोहोचला असल्याचे बोलले जात आहे. या सभेला आमदार किसन कथोरे समर्थक कार्यकर्ते गैरहजर असल्याचे दिसून आले. तर खासदार समर्थक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपसथित असल्याने मुरबाड विधानसभा क्षेत्रातील भाजपतील अंतर्गत राजकारण लवकरच चव्हाट्यावर येईल असे दिसून येत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *