पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : शिरूर तालुक्यातील पश्चिम टोकास असणाऱ्या सविंदणे गावात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यालयापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत टाळ, मृदुंग, वीणाचा गजर करत वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. विविध खेळांचे प्रात्यक्षिक केले. विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्व ग्रामस्थांना आकर्षित केले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील फुगडी खेळून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सखाराम पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले होते. या कार्यक्रमाला पालकांबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणेमहाराष्ट्रशिक्रापूरशिरूर
सविंदण्यात रंगला चिमुकल्यांचा दिंडी सोहळा
By SamajsheelJun 30, 2023, 19:50 pm0
396
Previous Postहिंदू -मुस्लिम ऐक्य अबाधित राखले पाहिजे- पोलिस निरिक्षक प्रमोद क्षीरसागर
Next PostMelhores Sites De Apostas Esportivas Em 202