हिंदू -मुस्लिम ऐक्य अबाधित राखले पाहिजे- पोलिस निरिक्षक प्रमोद क्षीरसागर

238
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पंढरपूर एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन हाद्दीतील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बान देणार नाही असा निर्णय घेतला.  यावेळी भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर सर्व मुस्लिम बांंधवाना पेढे भरवुन फेटे बांधण्यात आले. मुस्लिम समाजाने घेतलेला चांगला निर्णय त्याचा आदर्श  इतरांनी देखील घ्यावा असे पोलिस निरिक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले. शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील हाँलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पांचगे यांनी केले. यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, ग्रा प सदस्य ञिनयन कळमकर, माजी सरंपच रामदास सासवडे, सागर दरेकर , कानिफ गव्हाणे, सिराजभाई शेख, हरुन इनामदार अमीन तांबोळी, इसाकभाई शेख एन बी मुल्ला, फारुक ताबोळी, सिमाई महिला फौंडेशनच्या सीमा पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन आतकरी,  श्रीकांत नरके, विठ्ठल वाघ, शिक्रापूर पोलिस स्टेशन हाद्दीतील मुस्लिम बांधव बहुसंख्य ने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *