माजी आमदार गोटीरामभाऊ पवारांच्या वाढदिवशी १० हजार झाडे लावण्याचा संकल्प

231
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : लोकनेते मुरबाड विधानसभेचे माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या 9 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्ताने मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा प्रत्येक गट व पंचायत समितीच्या प्रत्येक गणात होणाऱ्या कार्यक्रमात 10 हजार झाडांची लागवड करण्याबरोबरच संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वृक्षलागवडीबरोबरच गुणवंत विद्यार्थी व 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानीत करण्यात येणार आहे. तालुक्यातील साडेआठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तूही दिली जाणार आहे. मुरबाड तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करताना गोटीरामभाऊ पवार यांची जनतेबरोबर आत्मियता निर्माण केली. त्यातून मुरबाड शहराबरोबरच ग्रामीण भाग आणि आदिवासी भागात त्यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच भागात जनसेवा शिक्षण प्रतिष्ठानबरोबरच कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच 2022/23या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गावात व घराघरांत जाऊन सन्मान केला जाणार आहे. तालुक्यातील साडेआठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याचबरोबर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान केला जाणार आहे. 9 जुलैनंतर दोन ते तीन दिवस हा उपक्रम साजरा केला जाणार असल्याची माहिती जनसेवा शिक्षण मंडळाच्या वतीने सागण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *