कवठे येमाईत एक कोटी नऊ लाखांच्या विकास कामांचा प्रारंभ – कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती 

450
       शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाई गावात आज दि. १५ ला एक कोटी ९ लाख २५ हजार रुपयांचा  विविध विकास कामांचा  भूमिपूजन सोहळा व प्रारंभ श्रीमती.सुनिताताई गावडे (जिल्हा परिषद सदस्य पुणे)  यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुभाषराव पोकळे (पंचायत समिती सदस्य शिरूर) सौ सुनिताताई बबनराव पोकळे (सरपंच,कवठे येमाई) श्री उत्तमराव जाधव (उपसरपंच, कवठे येमाई) व मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
         यावेळी सरपंच बबनराव पोकळे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे, मिठूलाल बाफना, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, बबनराव वागदरे निखिल घोडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बाफना, मधुकर रोकडे, राजेंद्र इचके, पांडुरंग भोर, सचिन बोराडे, गणेश उघडे, बाळशीराम मुंजाळ, किसन हिलाळ, निलेश पोकळे, चेअरमन विक्रम इचके, माजी चेअरमन डॉक्टर हेमंत पवार, काशिनाथ पोकळे, बबनराव इचके, जयसिंग इचके,  मा सरपंच अरुण भाऊ मुंजाळ, संचालक भाऊसाहेब घोडे,मारुती हिलाळ शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गुलाब वागदरे, नाथा हिलाळ, महादू इचके, दिलीप इचके, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश रत्नपारखी, मुख्याध्यापक शांताराम पोकळे,गायकवाड मॅडम, बाळासाहेब विखे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे,भानुदास हिलाळ साहेब, सौरभ भोर, सुदर्शन बोराडे, अतुल हिलाळ, सखाराम पोकळे, सोमनाथ सांडभोर,बाबु मेंबर इचके,दत्तात्रय पडवळ उपस्थित होते.
          जिल्हा विकास निधी व १५ व्या वित्त आयोगातून या विकासकामांना निधी मिळणार असून यातून प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती,जिल्हा परिषद शाळा कवठे गावठाण,मुंजाळवाडी,गणेशनगर,दत्त मंदिराजवळील स्मशानभूमी,काळूबाई मंदिर परिसर,वागदरे वस्ती रस्ता,डंपिंग ग्राउंड ऑल कंपाउंड,दत्त मंदिर परिसर,रेणुका माता मंदिर,हरिजनवस्ती समाजमंदिर शुशोभीकरण व विकास कामांचा यात समावेश आहे. आज या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे सरपंच सुनीता पोकळे,उपसरपंच उत्तमराव जाधव,ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *