शिरूर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

94

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेचे अनुष्ठान लाभले आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. यामध्ये हरिपाठ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिकिर्तन, आदि सांप्रदायिक कार्यक्रम संपन्न होत असतात. संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा पार पडतात. श्री संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठान, शिरूर (घोडनदी) यांच्या वतीने  १४ जुलै रोजी समाजप्रबोधनकार व प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.अनिताताई रावसाहेब महाराज जाधव, संगमनेर यांचे कीर्तन शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे सायं. ६.१५ वा. कीर्तन होणार असून, कीर्तनाचे थेट प्रेक्षेपण समाजशील न्यूज वर दाखवण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण बनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे :
सकाळी ६ वा. : महाअभिषेक
हस्ते : श्री. अनंत भुजबळ (प्र. दुय्यम निबंधक, केडगाव), सौ. सायली अनंत भुजबळ
दुपारी २ ते ५ वा. : हरी भजन
(सादरकर्ते : ध्यान मंदिर हरिपाठ भजनी मंडळ)
सायं. ५ ते ६ वा. : हरिपाठ
सायं. ६ वा. : महाआरती
मृदुंगमणी – ह.भ.प.रमेश महाराज तामडे गायक – ह.भ.प.भरत महाराज गुंजाळ

संत शिरोमणी सावता महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंग, ओव्या, भारूडे यांच्या निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं. याच जाणीवेतून महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले कीर्तनरुपी समाजप्रबोधन आजतागायत चालू आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *