निराधार महिलेच्या घरासाठी अनेकांचा मदतीचा हात – लोकसहभागातून घराचे काम पूर्णत्वाकडे 

500
       शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या श्री दत्त मंदिरानजीक राहणाऱ्या श्रीमती छाया भरत कदम या ६२ वर्षीय असाह्य,निराधार महिलेच्या घर बांधकामासाठी विविध स्थरातून अनेकांनी मदतीचा हात दिल्याने हे काम जवळपास पुर्णत्वाकडे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे,मधुकर रोकडे यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले.
       या महिलेच्या पडक्या घराच्या बांधकामासाठी मदत देणारे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव कुंभार यांनी येथे भेट देत समाधान व्यक्त केले आहे. ज्याचा कोणी नसतो त्याला परमेश्वरच वाली असल्याची भावना कुंभार यांनी यावेळी व्यक्त केली.या पडक्या घराच्या वस्तुस्तिथी विषयी जेष्ठ पत्रकार तथा समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक प्रा. सुभाष शेटे यांनी वर्तमानपत्र व समाजमाध्यमातून सातत्याने आवाज उठविल्याने त्यांच्याकडे ८० हजार रुपये जमा झाले होते. तरुण,ग्रामस्थानी देखील तात्काळ ५० हजार रुपयांची मदत केली यातून या निराधार महिलेचे घर पूर्ण होत आले आहे.
        विटा,सिमेंट,अँगल,पत्रा,दरवाजे,शटर,खिडकी,फरशी,किचन ओटा या जमा झालेल्या निधीतून पक्के घर तयार झाले असून गावात एका निराधार महिलेला लोकसहभागातून घर बांधून देण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता पत्रकार शेटे यांनी व्यक्त केली आहे. या घराचे लाईट फिटींग सामाजिक कार्यकर्ते सोपानराव वागदरे स्वखर्चाने करणार असून या निराधार महिलेस विनाशुल्क वीज जोडणी मिळावी म्हणून केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांच्याशी पत्रकार शेटे यांनी थेट संपर्क साधत विनंती केली असता शक्य असेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आज येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव गावडे यांनी दोन हजार रुपयांची  मदत छाया कदम या निराधार महिलेच्या घरासाठी जमा पत्रकार शेटे साहेब यांचेकडे जमा केली. आपण ही समाजाचे देणे लागतो याचे उत्तम उदाहरण गावडे गुरुजींनी यातून इतरांपुढे ठेवले आहे. कवठे येमाई सरपंच सुनीताताई बबनराव पोकळे व ग्रामस्थांच्या वतीने या घरासाठी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *