मुरबाड मध्ये घरफोडी ; पोलिसांना चोरट्यांचे आव्हान

407

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्ग 61 लगत असलेल्या अंजनी गॅस च्या मागच्या बाजूला असलेल्या न्यू अजिंक्य तारा बिल्डिंग मध्ये रात्री दोन च्या सुमारास चोरटयांनी सेफ्टी दरवाजाच्या कडी कोंडा तोडून घरातील किमती ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की न्यू अजिंक्य तारा या बिल्डिंग मध्ये राहणारे अनिल पापडे हे सह पत्निक आपल्या गावी गेले असता घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत चोरटयांनी काम फत्ते केले. रात्री दोन अडीच्या सुमारास पापडे यांचे शेजारी यशवंतराव यांना काही आवाज आल्याने त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले यावेळी काही घरांच्या कड्या लावून चोरांनी काम फत्ते केले होते. या बाबतची माहिती याचं बिल्डिंग मधील रहिवाशी केंबारी यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात दिली असता पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला . पापडे यांनी  गावाहून आल्यावर पोलिस ठाण्यात  जाऊन काही सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरटयांनी चोरल्याचे  सांगीतले . मुरबाड पोलिस सतत रिंग रूट पेट्रोलिंग करत असतात.या. पेट्रोलिंग मध्ये अनेक चोरीच्या घटना रोखण्यात व चोरट्यांना पकडण्यात यश आले होते असे असतांनाही चोरटयांनी हि घरफोडी केल्याने चोरटयांनी पोलिसांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *