स्वातंत्र्य दिनानिमित्त कृषीदुतांकडून घोडेगावात वृक्षारोपण

255

अहमदनगर (समाजशील वृत्तसेवा) : घोडेगाव ता. नेवासा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना बेल्हेकर समाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कर्यानुभव कार्यक्रम रावे (RAWE & AIA) अंतर्गत कृषिदूतांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘झाडे लावा झाडे जगवा’ कार्यक्रमाअंतर्गत कृषिदुत – गवळी विकास, गरड प्रदीप, गिरमकर ओम, खिलारी सचिन,पेहेरे सचिन आयोजित घोडेगाव येथे आंबा, वड, कडुलिंब व तसेच इतर झाडे गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या हस्ते लावण्यात आली .या प्रसंगी बहुसंख्येने समस्त ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. ही झाडे गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच स्मशानभूमि व गावातील सार्वजनिक ठिकाणी लावली असून, यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व कृषीदूत यांनी ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व विशद केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *