शिरूर जवळील अपघात प्रवणक्षेत्राची अधिकाऱ्यांसह पाहणी – भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांचा पुढाकार 

465
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पुणे-अहमदनगर महामार्गावर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिरूर जवळील विविध ठिकाणी विशेषतः बायपास जवळ सातत्याने अपघात होत असतात. हीच बाब लक्षात घेत भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पुढाकार घेत यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेत काल दि. २८ संबंधित विविध अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत अपघात कसे नियंत्रित होतील व त्यासाठी काय उपाययोजना राबवल्या पाहिजेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सोनावणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह महामार्गावरील विविध अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली.
    यावेळी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहूल कदम, शिरुर नगरपरिषदेच्या स्थापत्य अभियंता पल्लवी खिलारी, कनिष्ठ अभियंता नवनाथ शेळके, पंचायत समिती सदस्य,आबासाहेब सरोदे,शिरुर ग्रामीणचे माजी सरपंच विठ्ठल घावटे, युवा उद्योजक शरद पवार यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांसोबत विविध उपाययोजनांबाबत चर्चा झाली…
शिरूर बायपास जवळील  रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या हायवेला असलेला अंडरपास मार्ग स्वच्छ करुन वाहतुकीस तत्काळ खूला करण्याबाबत प्रशासनास सुचना करण्यात आल्या. त्या ठिकाणी मोठे दिशादर्शक फलक व ब्लिंकर बसवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सुचना करण्यात आल्या.पुणे नगर हायवेवर सरदवाडी, बोर्हाडेमळा या ठिकाणी वारंवार अपघात होतात, ते टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या संबंधितांना योग्य त्या सुचना दिल्या.या पुढील काळात रस्ते सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत असं भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी यावेळी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *