ज्ञानगंगा विश्व विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नगरपरिषदेमध्ये जाऊन सफाई कामगारांसोबत रक्षाबंधन सण केला साजरा

268

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : ज्ञानगंगा विश्व विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वच्छता दूतांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा केला. आपल्या निसर्गाला, आपल्या धरती मातेला स्वच्छ ठेवणारे ज्यांच्यामुळे आपलं वातावरण निरोगी राहतं जे खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्याचे रक्षण करतात अशा स्वच्छता दूतांना राखी बांधून ज्ञानगंगा विश्व विद्यालयातील विद्यार्थिनींनी खऱ्या अर्थाने आरोग्याचे रक्षण करणाऱ्या भावाला राखी बांधून हा सण साजरा केला. स्वच्छतेसाठी झटणाऱ्या हातात आज ज्ञानगंगा विश्व विद्यालयातील  विद्यार्थिनींनी मायेची घट्ट वीण असलेले रेशमी धागे बांधून समाजाप्रती ही वीण अधिकच घट्ट केली. सण संस्कृती परंपरा आपण जपल्या की त्या पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करतात. प्रत्येक काम महत्वाचे असते, संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणारे आपले स्वछतादूत जी एक प्रकारची सेवा देत असतात. त्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आज विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वच्छता दूत यांच्या सोबत रक्षाबंधन सण साजरा करून एक वेगळा संदेश दिला आहे.विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेली राखी पाहून सफाई कर्मचारी भारावून गेले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की तीस वर्षापासून आम्ही या सेवेमध्ये आहोत आणि पहिल्यांदाच आम्हाला राखी बांधून खऱ्या अर्थाने आमचा सन्मान झालेला असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिले.यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे, स्वछता निरीक्षक डी टी बर्गे, शहर समन्वयक शुभम निचित, मुकादम मनोज अहिरे, सागर कांबळे, कन्ट्रॅक्टर -सुवरवायजर निलेश जाधव उपस्थित होते. ज्ञानगंगा शाळेतील अशा विविध उपक्रमांना नेहमीच शाळेचे अध्यक्ष डॉ.राजेराम प्रभू घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे, सेक्रेटरी सविता घावटे, संस्थेचे सी.ई.ओ नितीन घावटे हे नेहमीच प्रोत्साहित करत असतात. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक संतोष येवले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, समन्वयिका जयश्री खणसे यांनी या उपक्रमास मार्गदर्शन केले तर तुपे मॅडम, पुजारी मॅडम, दंडवते मॅडम, भोंडवे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून उपक्रम यशस्वी केला.

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *