युवाक्रांती पोलीस मित्र,भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे कार्य गावागावात पोहचविण्याची गरज – प्रा.सुभाष अण्णा शेटे 

106
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – केंद्र सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या युवाक्रांती फाउंडेशन अंतर्गत,पोलीस मित्र, ग्राहक आणि पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेची ध्येय धोरणांचा अवलंब करीत सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होण्यास यामाध्यमातून मदत व्हावी या दृष्टीने संघटनेचे कार्य गावागावात पोहचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संघटनेचे पुणे जिल्हा  प्रसिद्धी प्रमुख जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी सा.समाजशिलशी बोलताना केले आहे.
        संघटनेचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघमारे व राज्य,जिल्हा स्तरावर कार्यरत असणारे राज्यातील इतर पदाधिकारी (महिला,पुरुष) यांच्या मार्गदर्शनातून अत्यंत पारदर्शी भूमिका ठेवत सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणुक,मदत कार्य करण्यासाठी संघटनेचे हे व्यासपीठ उपलब्ध झाले असून संघटनेची मजबूत फळी निर्माण करण्याकामी गाव,तालुका,जिल्हा स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त करतानाच आता गावागावात संघटनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करण्याची गरज युवाक्रांती पोलीस मित्र,भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी व्यक्त केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *