पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविणार – शांताराम कटके

97

शिक्रापूर,ता.शिरूर (प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पक्षाने संधी दिल्यास शिरुर हवेली विधानसभेची निवडणूक लढवु असे पुणे महानगरपालिकेचे स्विकृत नगरसेवक शांताराम कटके यांनी शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत सांगितले .यावेळी शिरुर हवेली दोन्ही भागातील पञकार बहुसंख्यने उपस्थित होते. पत्रकारासोबत सुसवांद व मनमोकळेपणाने गप्पा मारत असताना आपण शिरुर हवेलीच्या सर्वागीण विकासासाठी सज्ज आहोत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजित दादा गटाच्या वतीने ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे येणार असुन आजित दादानी संधी दिल्यास निवडणूक लढवुन संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले .पञकार ही शक्ती खुप मोठी आहे .ते एखाद्याला खुप उंचीवर नाहीतर रसातळालाही नेऊ शकतात .त्यामुळे पञकाराची मते अजमावुन निर्णय घेणे मला योग्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते वाघोली गावचे माजी उपसरपंच शांताराम कटके, राष्टवादीचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हळे उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *