घोडगंगा सहकारी कारखाना खाजगी होवू देणार नाही – संजय पाचंगे

111

शिक्रापूर,ता.शिरूर (प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : घोडगंगा सहकारी साखर कारखाना खाजगी होवू देणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे‌ यांनी पत्रकार परिषदेत केले. शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत भूमिका व पुढील दिशा जाहीर करण्यासाठी भाजपा उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री.संजय पाचंगे यांनी शिक्रापूर येथे २८ जुलैला पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पाचंगे पत्रकारांशी बोलत होते. आम्ही राजकीय लढाई लढत नाही कायदेशीर लढत आहे असे सांगून पाचंगे पुढे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार करणा-याला आम्ही मोकळे सोडणार नाही, कारखाना बंद होवू देणार नाही. घोडगंगा कारखाना बराचसा अजितदादांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. अजितदादा अर्थमंत्री आहेत. राज्य सहकारी बॅंकेने ३५ कोटी रूपये कारखान्याला कर्ज दिले आहे. यांची चौकशी त्यांनी करायला पाहिजे. कर्ज बेकायदेशीरपणे वापरलयं‌ हे सिद्ध होतंय.हे राज्य सरकारला बदनाम करताहेत. यांनी सरकारला वेठीस धरलयं‌ .घोड गंगा कारखाना खाजगी होवू देणार नाही असे संजय पाचंगे‌ यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *