शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गटातील सुमारे ३०० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार असल्याची माहिती शासनाच्या कृषी विभागाचे या विभागाचे कृषी सहायक नंदू जाधव यांनी सा.समाजशील न्यूज शी बोलताना सांगितले. महाराष्ट्र शासनाने अशा पात्र ई पीक पाहणी नोंदणी झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे. या बाबतची माहिती व मार्गदर्शन आज कवठे येमाई येथील पात्र शेतकरी लाभार्थ्याना देण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळेकृषी सहायक नंदू जाधव,अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
सन २०२३ या खरीप हंगामातील सोयाबीन पीक लागवड (इ पीक पाहणी नुसार) शेतकरी यामध्ये वैयक्तिक खातेदार यादी आणि सामाईक खातेदार यादी अशा दोन याद्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती ही जाधव यांनी दिली.
वैयक्तिक खातेदार यादी मधील लाभार्थी यांनी अर्थसहाय्य अनुदान लाभ मिळणेसाठी संमतीपत्र , आधार कार्ड झेरॉक्स वर स्वतःची स्व स्वाक्षरी सही करून व सामाईक खातेदार यादी मधील लाभार्थी यांनी अर्थसहाय्य अनुदान लाभ मिळणेसाठी सामायिक खातेदार ना हरकत पत्र ,आधार कार्ड झेरॉक्स, (झेरॉक्स वर स्वतःची सही करून) नंदू जाधव कृषी सहाययक. यांचे कडे दि. १८ ऑगस्ट पर्यंत जमा करावेत ज्यांचे कागदपत्रे वेळेत जमा होणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शेतकरी यांची राहील याची नोंद घेण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
हे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये असून जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत लाभ मिळणार आहे तरी पात्र लाभार्थी शेतकरी बांधवानी तात्काळ संबंधित योग्य ती कागपत्रे जमा करण्याचे आवाहन कृषी सहायक नंदू जाधव यांनी केले आहे.