शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आज ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल येथे धर्मेंद्र खांडरे (लिगल सेल, भाजप, महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा करण्यात आला. ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर नाट्य, नृत्य यासारखे विविध गुणदर्शन कार्यक्रम प्रस्तुत केले. प्राथमिक व माध्यमिक वर्गांनी परेड सारख्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नाटिकेने पालकांना अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी धर्मेंद्र खांडरे (अध्यक्ष, लिगल सेल, भाजप महाराष्ट्र राज्य ) यांनी विदयार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे तसेच शालेय जीवनात अभ्यास व परिश्रमाचे, आत्मनिर्भरतेचे महत्व पटवून दिले. प्रमुख अतिथी शेखर गायकवाड, पी.एस.आय., शुभम नवले पी.एस.आय., श्वेता कारंडे पी. एस.आय., मा. सरपंच वर्षा काळे यांनी पालकांना संबोधित केले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. राजेराम घावटे, उपाध्यक्ष दिपक घावटे, खजिनदार सुधिर शिंदे, सचिव सविताताई घावटे, संचालक प्रसाद घावटे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, सी.ई.ओ. डॉ. नितीन घावटे आदि उपस्थित होते व सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या शोभा अनाप, सह शालेय उपक्रम विभाग व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केलेल्या या सुंदर कार्यक्रमाची खाऊवाटप करून सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता वडेकर यांनी केले.