शिक्षक संघटनेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

396

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर -जिल्हा परिषदेच्या शाळांनी अनेक विद्यार्थी रूपाने मौल्यवान रत्न तयार केली असून, ती विविध उच्च दर्जाच्या पदावर कार्यरत आहे, हे काम आपल्या तालुक्यातील गुणी शिक्षकांनी केले असून, त्यांचा संघटनेच्या मार्फत यथोचित सन्मान होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे ,असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण व पशुसंवर्धन खात्याच्या सभापती सौ सुजाता अशोकराव पवार यांनी नुकतेच शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षकांच्या तळेगाव ढमढेरे येथे कार्यक्रमात प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते श्री संभाजीराव थोरात होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे व माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे हे होते. विशेष अतिथी म्हणून शिक्षण सहसंचालक श्री रमाकांत काटमोरे होते,संघटनेचे राज्य नेते रावसाहेब रोहकले, कार्यक्रमाला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंडे, चिटणीस खंडेराव ढोबळे, बापूसाहेब लांडगे ,शांताराम घोरपडे ,सुरेश सातपुते, सुनील शेळके ,अध्यक्ष संतोष गावडे ,तालुकाध्यक्ष नयन आरगडे ,कार्यध्यक्ष राहुल घोडे उपेंद्र डुंबरे ,सोपान शेलार, हिरामण ढोकले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष शेवाळे, सूत्रसंचालन श्री आप्पासाहेब रसाळ व गुणवंत शिक्षिका जयमाला मिडगुले तर आभार श्री राजाराम सकट यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *