वढू बुद्रुक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवलेमळामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

246

वढू बुद्रुक, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम सकट) : कोरेगाव भीमा -विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यांनी अधिकाधिक अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व हे विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावे असे प्रतिपादन वढु बुद्रुक गावचे सरपंच श्री अंकुश शिवले यांनी स स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वढू बुद्रुक नगरीचे माजी उपसरपंच शंकर वामन शिवले हे होते. सारिका अंकुश शिवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्री प्रवीण आरगडे, श्री सोमनाथ आरगडे यांनी शालेय साहित्य व शालेय स्वछतेचे साहित्य दिले., श्री सर्जेराव शिवले अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, उद्योगपती शहाजीराव आहेर, ज्ञानेश्वर शिवले, माजी सरपंच सारिका अंकुश शिवले, उपसरपंच संजय म्हस्कु शिवले, संभाजी आहेर, बापू शिवले, सुरेश दरगुडे, नितीन शिवले, संध्या आरगडे, कोमल राहुल शिवले, अमोल शिवले, रामदास शिवले, अंगणवाडी सेविका सौ शिवले हे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम सकट यांनी तर आभार श्री शिरकर यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *