शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : 10 ऑगस्ट शिक्षक भवन नवी पेठ या ठिकाणी नीलम ताई शिर्के- सामंत यांच्या हस्ते ‘खजिना नाट्यछटांचा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. चाकण मधील जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल च्या शिक्षिका सौ शैला भाडळे यांनी स्वतः लिहिलेल्या नाट्यछटांच्या पुस्तकाचे प्रकाशन सौ नीलम ताई शिर्के- सामंत अभिनेत्री आणि अध्यक्ष बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती ,मुंबई अभिनेत्री सौ. रुजुता ताई देशमुख तसेच श्री विजय कोलते,अध्यक्ष संस्थाचालक शिक्षक मंडळ, पुणे ग्रामीण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माई कोलते , सौ दिपाली शेळके, जिल्हा अध्यक्ष बालरंगभूमी परिषद पुणे , दीपक रेगे कार्याध्यक्ष बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा ,अरुण पटवर्धन नारायण करपे उपाध्यक्ष बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा, प्रमुख कार्यवाह देवेंद्र भिडे उपस्थित होते. लेखिका शैला भाडळे यांच्या हस्ते नीलम ताई शिर्के – सामंत आणि दिपाली शेळके यांचा सत्कार करण्यात आला. बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने लेखिका शैला ताई भाडळे यांचे अभिनंदन करण्यात आले.
Home महाराष्ट्र पुणे नीलम ताई शिर्के- सामंत यांच्या हस्ते ‘खजिना नाट्यछटांचा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न
पुणेमहाराष्ट्रशिक्रापूरशिरूर
नीलम ताई शिर्के- सामंत यांच्या हस्ते ‘खजिना नाट्यछटांचा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न
By SamajsheelAug 17, 2024, 08:43 am0
150
Previous Postभारतीय स्वातंत्र्य दिन शिक्रापूर व परिसरात विविध उपक्रमाने साजरा
Next Postवढू बुद्रुक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवलेमळामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा