भारतीय स्वातंत्र्य दिन शिक्रापूर व परिसरात विविध उपक्रमाने साजरा

111

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा ,साजरा करूया उत्सव स्वातंत्र्याचा!! दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या अभियाना अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट रोजी शिक्रापूर परिसरातील सर्व माजी सैनिक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तदनंतर आजादी का अमृत महोत्सव या फलकाला पुष्पहार अर्पण करून शिक्रापूर ग्रामपंचायत येथून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी सैनिक शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला व सर्वांच्या चेहऱ्या वरती आनंदाचा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. 14 ऑगस्ट रोजी शिक्रापूर नगरीच्या उपसरपंच सारिका ताई सासवडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.  त्यावेळी प्रामुख्याने उपस्थितांमध्ये उपसरपंच सर्व सदस्य ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे, तलाठी सुशीला गायकवाड, कृषी अधिकारी अशोक जाधव साहेब, माजी सैनिक शिक्षक वृंद विद्यार्थी पत्रकार बांधव तसेच  विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्रापूर परिसरामध्ये पोलीस स्टेशन जिल्हा परिषद शाळा शिक्रापूर गावठाण जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन वाबळेवाडी शाळा राऊतवाडी शाळा चाकण रोड शाळा 24 वा मैल शाळा लव्हार्डे पुनर्वसन शाळा ग्रामीण रुग्णालय आरोग्य उपकेंद्र महावितरण ऑफिस विद्याधाम प्रशाला मोती चौक चासकमान वसाहत तसेच शिक्रापूर परिसरातील सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. स्वतंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिक्रापूर परिसरामध्ये 78 देशी झाडांचे शिक्रापूर ग्रामपंचायत व समस्या उपाय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 78 देशी झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पटागणात झेडांवदन करण्यात आले. शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे यांच्या हस्ते झेडांवदन करण्यात आले. शिक्रापूरमध्ये पेठामधुन भव्य प्रमाणात प्रभातफेरी काढण्यात आली. जि.प प्रथामिक शाळेमध्ये मुख्यध्यापिका साधना शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शिष्यवृती परिक्षेत यश संपादन केलेल्या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. विविधप्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या शिवाय पोलिस स्टेशन मोतीचौक आरोग्य केंद येथे झेंडा वदन संपन्न झाले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन शिक्रापूर येथील समस्या उपाय गुप यांच्या वतोने वेगवेगळ्या प्रकाराच्या ६३ वृक्षाची लागवड स्मशानभुमी, नदीपाञ, बैलगाडा घाट परिसरात वृक्षारोपन केले. यावेळी गुपचे सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *