युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेतील सहकार्यांनी ध्येय,धोरणांचा अवलंब करावा – राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी 

195
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेली युवाक्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र दुसरा वर्धापन दिन  दि. १८ ला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.येथील श्री भैरवनाथ मंदिरातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी हे होते. संघटनेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा समाजातील सर्वसामान्य,अडचणीत असलेल्या नागरिकांना योग्य ती मदत मिळावी त्या करीता युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या ध्येय धोरणांचा संघटनेत सहभागी प्रत्येकाने विनाशर्त व प्रामाणिक पणे अवलंब करावा असे आवाहन अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी केले. 
      यावेळी संघटनेचे पदाधिकारी मा.श्री.रविंद्र सूर्यवंशी  ( संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष* ),मा. जयश्री ताई आहिरे ( राष्ट्रीय युवती अध्यक्षा ),मा. श्री. नानासाहेब बढे (पाटील ) ( संचालक तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष ) मा. उमेशजी श्रीवास्तव ( राष्ट्रीय संपर्क प्रमुख ), मा. डॉ. राजेश्वर हेंद्रे ( राष्ट्रीय सल्लागार ) मा. सौ.  वसुधाताई नाईक ( महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा )* मा. किरण वाघमारे ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ), मा. सुरेश आप्पा गायकवाड ( महाराष्ट्र प्रदेश सह – संघटक ), जेष्ठ पत्रकार,प्रा. मा. सुभाष आण्णा शेटे ( महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक) मा. शिवाजीराव  शेलार (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ), मा. अमृत ताई पठारे ( पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा ),मा.प्रा. आनंदराव पगारे ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ),वैशाली बांगर,पल्लवी वाघ,अंकुश आगरकर,विलासराव रोहिले,विलास गोसावी व पश्चिम महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले संघटनेचे अनेक महिला,पुरुष पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
          प्रारंभी मलठण गावातून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सनई,ताफयाच्या निनादात  भव्य रॅली काढण्यात आली. मुख्य कार्यक्रमात अनेक वक्त्यांची भाषणे झाली. यात अनेकांनी संघटनेत कामकाज कसे करावे, आय कार्डचा वापर व संघटनेच्या ध्येय धोरणाचा वापर कसा करावा याबाबत उपस्थितांना सुयोग्य मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यवंशी यांनी केलेले कार्य उदाहरणासह सांगत उपस्थितांची वाहवा मिळवली.कार्यक्रमाच्या शेवटी नवीन सदस्यांचे आय कार्ड वाटप,भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *