गहाळ झालेले मोबाईल शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधन सणाच्या दिवशी नागरिकांना परत

141

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील मोबाईल गहाळ झालेच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलीस स्टेशन ला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने गहाळ झालेल्या विविध मोबाईलचा पुन्हा एकदा पोलिसांनी शोध घेऊन 10 मोबाईल शिरूर पोलिसांनी शोधून काढले. आज दि. ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या दिवशी मूळ नागरिकांना परत केले. गहाळ झालेले मोबाईल शोधण्याचे कार्य शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांनी केले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित मोबाईल धारकांनी शिरूर पोलिसांचे आभार मनात अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *