दिंडनेर्लीत कृषिदूतांचे आगमन ; शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

107

करवीर,कोल्हापूर (समाजशील वृत्तसेवा) : दिंडनेर्लीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. डी .वाय .पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांचे आगमन झाले. यानिमित्ताने दिंडनेर्ली गावच्या सरपंच मंगल कांबळे, राजाराम चौगुले, ग्रामविकास अधिकारी काकासाहेब पाटील व ग्रामस्थांच्या वतीने कृषी दूतांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत कृषीदूत धनंजय गरदरे, रोशन देवगुडे ,प्रमोद दाईंगडे, शिवम कुडक ,सुरज बाबणावार भातमारे रोहन पुढील काही दिवस गावामध्ये राहणार असून विद्यापीठ व विद्यालयाच्या संशोधनाची माहिती, विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. यात प्रामुख्याने बीज प्रक्रिया, पिकांवरील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, खतांचा योग्य वापर ,सेंद्रिय शेती, फळबाग नियोजन ,माती परीक्षण  प्रात्यक्षिके ,रोपवाटिका नियोजन , शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीविषयक ॲप याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी बहुसंख्येने शेतकरी ,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *