अशोक सावंत यांचे दीर्घ आजाराने निधन 

488

अशोक सावंत यांचे दीर्घ आजाराने निधन

              शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येशील समस्त बाराभाऊ बलुतेदार मंडळाचे अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक सखाराम सावंत यांचे आज दि.१५ ला सकाळी वयाच्या ५५ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.अशोक सावंत यांनी अनेक वर्ष टाकळी हाजी व कवठे येमाई विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव म्हणून उत्कृष्ठरित्या काम पाहिले.ग्रामपंचायत व बाराभाऊ बलुतेदार मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक व विकासात्मक कामे मार्गी लावली. परिसरातील अनेक सामाजिक कामात त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या पश्चात किसन,वसंत हे २ भाऊ,भावजयी,एक बहीण,पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जि. प. सदस्या सुनिता गावडे, पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, कवठे येमाईच्या सरपंच मंगलताई रामदास सांडभोर,टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांनी शोक व्यक्त केला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *