युवाक्रांती पोलीस मित्र संघटनेच्या शिरूर बैठकीत तालुका नवीन कार्यकारिणीची निवड – सुरेश गायकवाड,शिवाजी शेलार यांचे मार्गदर्शन 

145
         शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – युवाक्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,माहिती अधिकार,ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेची शिरूर तालुका कार्यकारणी निवड बैठक काल दि.१७ ला येथील आदर्श हॉटेल येथे पार पडली. तालुक्यातील विविध,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे व संघटनेची नियमावली,ध्येय धोरणे समजून घेतलेले अनेक सहकारी नव्याने संघटनेत दाखल झाले. संघटनेचे पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड यांच्या माध्यमातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमदे पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शेलार हे होते. तर उपस्थितांना संघटनेत कार्य कशा प्रकारे करायचे,संघटना वाढीसाठी कोणते प्रयत्न करावयाचे,राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी व राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे यांच्या मार्गदर्शन व विचारातून संघटनेची ध्येय,धोरणानुसार सर्वांनी कार्यरत राहून समाजातील वंचित,गोरगरीबांना योग्य ती मदत मिळवून देण्याचे व शिरूर तालुक्यातील गावोगावी युवा क्रांती संघटन संघटन मजबूत करण्याचे आवाहन संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱयांना केले.तसेच उपस्थित सदस्य पदाधिकारी यांनी संघटनेचे ओळखपत्र प्राप्त झाल्यावर फक्त ओळखपत्र गळ्यात अडकवून संघटने अंतर्गत सामाजिक कार्य केल्याचे दिसून न कुठल्याही क्षणी असे तालुका कार्यकारणी सदस्य,पदाधिकारी पदमुक्त करण्याचा इशारा प्रा.शेटे,आप्पा गायकवाड,शिवाजीराव शेलार यांनी दिला.
           
शिरूर तालुका पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र यांची शिरूर तालुका कार्यकारणी काल जाहीर करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या सर्व नवीन पदाधिकारी,सदस्य यांनी संघटनेत सहभाग अर्ज भरून आपला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक प्रत्येकाने ११००/- रूपये प्रति पदाधिकारी यांनी दोन दिवसांत जमा करावी. या करीता पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड यांच्या पोलीस मित्र माहिती अधिकार संघटना संपर्क कार्यालय, मलठण ता.शिरूर यांच्याकडे स्वतः व्यक्तीगत येऊन आपले फोटो, आधार कार्ड कॉपी, मोबाईल नंबर  जमा करावेत असे आवाहन युवाक्रांती पोलीस मित्र संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड यांनी केले आहे. या करीता त्यांच्या  9850639169 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवाजीराव शेलार यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *