शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे मैदानी व सांघिक स्पर्धेत यश

86

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद पुणे आयोजित तालुकास्तरीय मैदानी व सांघिक स्पर्धा नुकत्याच पार पडल्या असून या स्पर्धेत विविध खेळांमध्ये विद्याधाम प्रशाला शिक्रापूरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्रशालाचे प्राचार्य सोनबापू गद्रे व उपप्राचार्य सुनील थोरात यांनी दिली. शिरूर येथील सि टी बोराकॉलेज शिरूर च्या मैदानावर नुकत्याच झालेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा व तालुकास्तरीय सांघिक कबड्डी व खो-खो स्पर्धा अनुक्रमे शिक्रापूर व धानोरे या ठिकाणी पार पडल्या वरील मैदानी व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये बारा सन्मानचिन्ह  मिळवले. तर दहा खेळाडूंची जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली. प्रशालेतील विद्यार्थ्यांपैकी थाळी फेक स्पर्धेत गौरी भुजबळ हिने प्रथम क्रमांक, तर लांब उडी स्पर्धेत घुगे रागिणी, चाफे वैष्णवी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर रिले स्पर्धेमध्ये शितल मुरकुटे, सिद्धी महाजन, स्वाती कल्याणकर, मेहेक पठाण यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर तीन हजार मीटर धावणे रामेश्वर सोनवणे यांने द्वितीय क्रमांक मिळवला. बुद्धिबळ स्पर्धेत ऐवळे वेदांत प्रथम तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला. खो-खो स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात मुले आणि मुली द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक सुनील दिवटे, सुनील माने, नानासाहेब गावडे, भाग्यश्री दिवटे, दीपक गोलांडे, अर्चना यादव, वंदना ओहळ शरद घोडे, सोनाली काळे यांनी मार्गदर्शन केले. तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात पर्यवेक्षक संजय शेळके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे, पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बोरा व संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांनी अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *