व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षकांच्या हस्ते गणेशाची आरती

207
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून शिरूर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलने यंदाही तुरटीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तर याच उपक्रमाचे औचित्य साधत आज संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा यांनी आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांना आरतीसाठी आमंत्रित करीत त्यांचा शाल व सन्मान चिन्ह देत त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी सी टी बोरा कॉलेजे चे प्रिन्सिपल डॉ. के सी मोहिते, ज्ञानगंगा कॉलेजे चे पर्यवेक्षक प्रा. व्ही.डी.शिंदे, मा.प्राचार्य आर.एस. जैन, प्रा.अनिल तांबोळी, प्रा. मुळे सर, प्रा. जयंत जोशी, प्रा.जीरे, प्रा. लक्ष्मीनारायण सारडा, प्रा.सतीश धुमाळ उपस्थित होते. तर सध्या ग्लोबल वार्मिंगसह हवामान बदलाचा गंभीर प्रश्न होऊ लागला आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणाने पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून, उद्याच्या पिढीला चांगले पर्यावरण ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून मागील दोन वर्षापासून पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचा भाग म्हणून व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर मध्ये तुरटी पासून बनवलेले मूर्ती बसवली जात असल्याचे व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख विकास पोखरणा यांनी सांगितले.यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल पास्क्वीन काझी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *