गणेश चतुर्थी असताना ही आरोग्य विभाग,आशा सेविकांकडून कवठे,कान्हूर येथे सर्वे – सर्दी,खोकला,घसा,अंगदुखी रुग्णांची घेतली माहिती 

980
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राज्यभरात आज श्री गणेश चतुर्थी उत्सव सूर होत असताना जन आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून शिरूर तालुक्यातील कवठे येमाई,कान्हूर मेसाई गावात तालुका हिवताप अधिकारी,४ आरोग्य निरीक्षक व सर्वच आशा वर्कर यांच्या पथकाने परिसर पिंजून काढीत घरोघरी भेटी देत सर्दी,खोकला,घसा,अंगदुखी जाणवत असलेल्या रुग्णांची भेट घेत योग्य ते औषोधोपचार देत व हे आजार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत सर्वांनीच मार्गदर्शन करीत योग्य त्या सूचना दिल्या.
         मागील आठवड्यात या दोन्ही गावात सर्दी,खोकला,घसा,अंगदुखी सारखे आजार असलेले अनेक रुग्ण दिसून येत होते. त्यातच कवठे येमाईत गावठाणात रक डेंग्यूचा रुग्ण आढळून आला होता. या बाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांना सूचना देताच आरोग्य विभाग अलर्ट झाला. याबाबत सा.समाजशील मधून सविस्तर वृत्त ही देण्यात आले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत आज गणेश चतुर्थी सुट्टी असून ही तालुका हिवताप अधिकारी जालिंदर मारणे,आरोग्य निरीक्षक विनायकराव गोसावी,बलभीम पठारे,संतोष चोपडा,संदीप कुंजीर,कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्य करणाऱ्या आशा सेविका गट प्रवर्तक रुपाली जाधव,आशा सेविका प्रगती कांदळकर,मीरा कांदळकर यांच्यासह कवठे येमाई,कान्हूर मेसाई येथील एकूण २२ आशा वर्कर या सर्व्हेत सहभागी झाल्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी या आरोग्य पथकांस दूषित पाणी आढळले ते बॅरल लगेच रिकामे करण्या आले.सर्दी,खोकला,घसा,अंगदुखी सारखा त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना लगेचच औषोधोपचार करण्यात आले. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,पाण्याच्या टाक्या किमान आठ दिवसांनी स्वच्छ कराव्यात,परिसर देखील स्वच्छ ठेवावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दामोदर मोरे,कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिरसाट,तालुका हिवताप अधिकारी जालिंदर मारणे व आरोग्य निरीक्षकांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *