सविंदणेच्या पूर्व नरवडे मळयातील चोरी झालेले दोन्ही रोहित्र तात्काळ बसविले – सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्ववत

162
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागात टोकास असलेल्या सविंदणेच्या पूर्व नरवडे मळा नजीकच्या दोन रोहित्रांवर चोरट्यांचा डल्ला मारल्याची घटना सोमवारी दि. १८ पहाटेच्या दरम्यान घडली होती. स्थानिक शेतकरी महेंद्र नरवडे यांनी ही बाब सा.समाजशील चे कार्यकारी संपादक जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांना सांगितली. शेटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तेथील वस्तुस्थितीची माहिती महावितरणच्या केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दरवडे ,शिरूर पोलीस यांना दिली.
           येथील गावठाण पाणीपुरवठा योजनेचे एक व बाजूकडील हाडकी हाडवळा असे दोन विद्युत रोहित फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली होती.या चोरीच्या घटने  बाबत शिरूर पोलीस स्टेशनला ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी पत्र दिले होते.
        ‌    सविंदणे हद्दीतील ग्रामपंचायत गावठाण पाणीपुरवठा व कामठेवाडी, डोंगर भाग,पिराचा माळ या ठिकाणी पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरींचे विद्युत कनेक्शन असून त्यांचे ट्रांसफार्मर चोरी झाल्यामुळे गावठाण व इतर वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा,शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला होता.ही बाब लक्षात घेत महावितरणने दोनच दिवसांत ही दोन्ही रोहित्रे बसविल्याने पाणीपुरवठा सुरु झाला. या घटनेबाबत तात्काळ व सविस्तर बातमी देत समस्येविषयी आवाज उठविण्याऱ्या सा.समाजशीलचे सविंदणे गावच्या सरपंच शुभांगी पडवळ,उपसरपंच भोलेनाथ पडवळ यांनी अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *