एस टी प्रवासा दरम्यान छातीत कळ आलेल्या रुग्नाला तात्काळ मदतीचा हात – युवा क्रांती च्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे यांचे आदर्शवत कार्य 

250
  शिर्डी,अहमदनगर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आजच्या या धकाधकीच्या जीवनांत अगदी जवळच्यांना बोलणे तर दूरच पण साधी आस्थेने चौकशी करणे ही दुरापास्त झाले असताना समाजात अजून ही सामाजिकतेचा ध्यास व वसा हाती घेतलेली विविध क्षेत्रात कार्यरत असणारी काही चांगली व्यक्तिमत्वे पाहावयास मिळतात जी मनापासून इतरांचे चांगले व्हावे व आपल्याकडून शक्य ती मदत त्यांना वेळेला करता यावी म्हणून सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यापैकीच एक सुंदर व प्रेरणादाई उदाहरण म्हणजे युवाक्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे या होत.
जयश्री ताई आहिरे या मागील काही वर्षात अडचणीत सापडलेल्या हजारो नागरिकांना योग्य ती मदत मिळवून देत मदतीचा हात व आधार देण्याचे कार्य त्या मनापासून करीत आहेत. नुकत्याच त्या शिर्डी येथून एस टी बस ने नाशिक कडे प्रवास करीत असतांना वावी ते सिन्नर च्या दरम्यान बस मधील प्रवाशी शुभम खैरनार यांच्या छातीत अचानक कळ आल्यासारखा आणि स्वास घेण्यास त्रास होऊ लागला दरम्यान शुभमचे डोळे ही फिरल्याचे पाहून बस मधील इतर प्रवासी घाबरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जयश्रीताईंनी चालकास बस तात्काळ थांबविण्यास सांगून शुभमची छाती प्रेस करून एस टी बस तात्काळ सिन्नर येथील रुग्णालयात घ्यावयास सांगितली. तात्काळ शुभमला रुग्णालयात दाखल करीत योग्य ते औषोधोपचार मिळवून देत एक जीवदान देण्याचे कार्य केले. जयश्री ताई आहिरे यांचे हे दैदिप्यमान कार्य व तत्परता पाहून बस चालक,वाहक व इतर प्रवाशांनी ताईंचे आभार मानत,अभिनंदन करीत कृतज्ञता व्यक्त केली. घटनेचे गांभीर्य पाहून एका प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत मिळवून देत जीवनाची नवसंजीवनी प्राप्त करून देणाऱ्या जयश्री ताईंच्या या प्रेरणादायी व आदर्शवत अशा महान कार्याचे युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार,ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प.नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय संघटक राजेंद्र थोरात महाराज,प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे,पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी शेलार,विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड व युवा क्रांतीच्या असंख्य पदाधिकारी,सदस्य यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *