पुणे जिल्यातील युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेतील पाच शिलेदारांचा ग्लोबल प्रेरणा पुरस्काराने गौरव  

306
बेडकीहाळ, बेळगाव – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकीहाळ,बेळगाव जिल्हा आयोजित कर्नाटक, महाराष्ट्र,गोवा या तीन राज्य मिळुन आयोजित कन्नड व मराठी कवी संमेलनामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवा क्रांती पोलिस मित्र संघटतील पुणे जिल्ह्यातील पाच शिलेदारांचा ते सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल काल दि. २४ ला बेडकीहाळ,बेळगाव येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभात ग्लोबल प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
 यात किरण वाघमारे युवा क्रांती पोलिस मित्र संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,संगिता नामदेव रोकडे युवा क्रांती पोलिस मित्र संघटना पुणे जिल्हा महिला अध्यक्ष, शिवाजीराव शेलार युवा क्रांती पोलिस मित्र संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष,वैशाली बांगर युवा क्रांती पोलिस मित्र संघटना पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष व मंगलताई सासवडे युवा क्रांती पोलिस मित्र संघटना पुणे जिल्हा महिला सचिव यांना सावित्रीबाई फुले यांचे तेरावे वंशज दिलीप साहेब आणि कै.बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत  राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा पुरस्कार २०२३ पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
    संघटनेच्या पुणे जिल्ह्यातील या पाच शिलेदारांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,नाना महाराज कापडणीस,अजय जोशी,प्रा.पत्रकार सुभाष शेटे, सुरेश आप्पा गायकवाड,विलासराव रोहिले यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *