“I.N.D.I.A.” आघाडी मुरबाड मध्ये आक्रमक ; केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात आत्मक्लेश आंदोलनं

208

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : देशात व राज्यात केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या हुकूमशाही निर्णयाविरोधात मुरबाडमध्ये I.N.D.I.A.आघाडी ने आक्रमक होऊन मुरबाड तिन हात नाका 130 फुटी ध्वजाखाली आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस उपस्थीत होते. सामान्य जनतेवर लादणारे खाजगीकरण, जातीय-धार्मिक द्वेष या विरोधात सर्व लोकशाही वादी राजकीय पक्षातील  “I.N.D.I.A.” आघाडीतील मुरबाड तालुक्यातील घटक पक्षांनी आयोजित केलेल्या आत्मक्लेश आंदोलनात कामगार व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तीन हात नाका, पर्यंत रॅली काढून घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. या आत्मक्लेश आंदोलनात महाराष्ट्र शासनातील सरळसेवा नोकर भरती खाजगी कंपनी द्वारे करण्याचा निर्णयाला ,प्राथमिक शाळा खाजगी कार्पोरेट सेक्टरला दत्तक देणे,विद्युत मंडळातील प्रीपेड मिटर लावण्याचा तकलादू निर्णय, शेतकरी विमा योजना व पीक नोंदी बाबत होणारी गफलत, घरगुती गॅसचे वाढीव दर ,पेट्रोल डिझेलयात होणारी भाववाढ  कल्याण-मुरबाड-माळशेज घाट महामार्ग रुंदीकरण कामगार कायदे रद्द करणे या सारख्या सामान्य नागरिकांना कोंडीत पकडनारे निर्णय लादल्याने आज I.N.D.I.A.च्या माध्यमातून जुडेगा भारत! जितेगा इंडिया! नारा देत आत्मक्लेश केला. यावेळी आर पी आय सेक्यु. चे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख मधूकर घुडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे नामदेव गायकवाड, दिपक वाघचौरे, संतोष विशे, कविता वरे, दिलीप धनगर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे महेश तपासे व शैलेश वडनेरे हे या ठिकाणी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *