आमदाबाद येथे सलग दुसऱ्या दिवशीही चोरी – लाखोंचा ऐवज लंपास – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

216
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आमदाबाद ता शिरूर येथील पुरातन महादेव मंदीरामधील कुलूप तोडुन पिंढीवरील पितळाचा नाग व समईची चोरी तसेच दुडेवाडी येथील मारुती मंदीरातील स्पिकर मशिनची शनिवारी रात्री चोरी झाली आहे  तर दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री आमदाबाद फाटा येथील माजी पोलिस पाटील शिवाजीराव थोरात व अमोल भागचंद जाधव यांच्या घरी चोरीची घटना घडली यात चोरटयांनी लाखोचा ऐवज लंपास केला आहे .त्यामुळे या भागात नागरीकां मध्ये  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . शनिवारची घटना ताजी असतानाचं दुसऱ्या दिवशी चोरांनी पुन्हा आमदाबादला लक्ष केल्याचे दिसुन आले . माजी पोलिस पाटील शिवाजी थोरात व अमोल जाधव यांचे फाट्याजवळ घर असुन याबाबत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार रात्री तीनच्या सुमारास तीन चोरांनी घरात घुसुन महीलांच्या गळ्यातील सुमारे सव्वा लाख रुपयांच्या  दागिन्यांची चोरी केली आहे . त्यांनी चोरांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती शिरूर पोलिसांना समजताच तत्काळ पोलिरा उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर,कॉन्स्टेबल दिपक पवार,उमेश भगत हे आमदाबाद येथे पोहचले. या परिसरात सध्या मोठ्या प्रमानात चोऱ्या होत आहेत.नदी किनारी असलेले शेती पंप ,मोटारी केबल चोरीचे प्रमाण वाढले असुन मोठ्या प्रमाणात अर्थिक फटका बसत असल्यांने शेतकरी हतबल झाले आहेत. या पुर्वी कवठे येमाई (गांजेवाडी ) येथील तुकाईदेवी मंदीरातही चोरी झाली होती  त्यामुळे भाविक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत .परिसरातील अनेक मंदिरातील दानपेट्या,स्पीकर मशीन चोरीच्या घटना वारंवार घडत असून ग्रामस्थ व देवस्थान कमिटीने  मंदीर परीसरात सि सी टीव्ही कॅमेरे लावण्यांचे आवाहन शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप,सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उप निरीक्षक सुनिल उगले यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *