पाणी असलेल्या ओढे,नाल्यांवर अधिकाधिक वनराई बंधारे बांधा – शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचे आवाहन 

184
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – यावर्षी खरीप हंगामात पाऊसाने शिरूर तालुक्यात पूर्ण पाठ फिरवली त्यामुळे दुष्काळाची छाया गडद होत असतानाच श्री गणेशा च्या आगमन बरोबरच वरून राजाचे आगमन झाले. तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी वरून राजाची कृपा झाली.ओढे,नाले पाण्या ने खळखळू लागले.हे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावागावात लोकसहभाग व श्रमदानातून त्या त्या परिसरातील शेतीला वरदान ठरतील असे अधिकाधिक वनराई बंधारे बांधा त्यामुळे परिसरातील पाणी साठे वाढतील,विहिरींना पाणी वाढेल,जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही बऱ्याच अंशी मार्गी लागेल व शेती सुजलाम सुफलाम होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व्यक्त केला आहे. त्याच बरोबर पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना ही तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याची गरज तहसीलदार म्हस्के यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केली आहे.
       जिल्हाधिकारी पुणे यांची संकल्पना व उपविभागीय अधिकारी देवकाते यांच्या मार्गदर्शनातून शिरूर तालुक्यात उपलब्ध जलश्रोतांवर वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना करण्यात आल्या असून महसूल खते,वन खते,कृषी खाते,शिक्षण विभाग,तालुक्यातील विविध सामाजिक संस्था,सार्वजनिक बांधकाम खाते या सर्वांच्या सहभागातून शिरूर तालुक्यात ७०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी वनराई बंधारे तयार करण्याचे काम जोमाने सुरु असल्याचे तहसीलदार म्हस्के यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *