वाट चुकलेल्या आजीला दिलासा देण्याचे कार्य – जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून युवा क्रांतीच्या धुळे टीमचे कार्य – आजी वडगावला खुर्दला घरी रवाना 

377
धुळे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी राज्यात समाजसेवेची आवड असणाऱ्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून युवा क्रांती फाउंडेशन हे एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्याच अनुषंगाने आज दि.२७ ला आपल्या धुळे जिल्हा टीमने एक चांगले कार्य करीत इतरांपुढे उत्तम आदर्श ठेवला आहे.
आपल्या कार्यातून धुळे युवा क्रांती,पोलीस मित्र,माहिती अधिकार,ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेचे नाव उंचावण्याचे काम धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रसाद वाणी त्यांच्यासोबत डॉक्टर सौ. भाग्यश्री कुलकर्णी आणि शबाना शेख,आशा ननावरे यांनी केले आहे.सकाळपासून एक ८५ वर्षांची वयस्कर आजी वाट चुकलेल्या अवस्थेत धुळे बसस्थानकात युवा क्रांतीच्या धुळ्यातील कार्यकर्त्या आशा ननावरे यांना दुपारी दोनच्या दरम्यान सर्वप्रथम आजी गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आल्या.क्षणाचा ही विलंब न लावता त्यांनी लगेचच धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद वाणी  ही कल्पना दिली. वाणी यांनी तात्काळ आजींना रिक्षात बसवून तात्काळ त्यांच्या हॊटेलवर घेऊन येण्यास सांगितले. तो पर्यंत संघटनेचे तेथील इतर कार्यकर्ते ही दाखल झाले. आजी आपला घरचा रस्ता चुकलेल्या होत्या. पण त्यांना काहीच सांगता येत नव्हते. वाणी यांनी दिलासा देत नाश्ता,चहा देत विश्वासात घेतले. आजींकडे चौकशी करता त्यांच्याकडे आधार कार्ड मिळाले. त्यांच्याकडे चाळीसगाव ते धुळे असे बस तिकीट होते. त्या आजीच गाव -मुक्काम पोस्ट वडगाव खुर्द, ता. भडगाव जिल्हा जळगाव येथील असून त्यांना गावी जायचे होते  श्री प्रसाद वाणी यांनी त्यांच्या नातवाचा कॉन्टॅक्ट नंबर शोधून आजीला त्यांच्या नातवासी कॉन्टॅक्ट करून प्रसाद वाणी यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या दुकानात बसून ठेवले आणि समोरच योगायोगाने त्यांची नात आणि तिने पाहिलं की, आजी इथे दिसते त्यांची भेट घालून नातवाशी बोलणं करून दिलं आणि सुखरूप आजींना त्यांच्या घरी रवाना केल.तत्पूर्वी वाट चुकलेल्या आजींना घरी सुखरूप पोहचवायचेच असा संकल्प करीत धुळे टीमने आजींसोबत एक व्हिडीओ,फोटो काढला व युवा क्रांती च्या ग्रुपसह समाज माध्यमांवर आजींना ओळखणारे कोणी तरी मिळेल या हेतूने व्हायरल केला.आजींची धुळात मोबाईल शॉपीत काम निमित्ताने आलेल्या आपल्या आजीला समोरच्या वाणी यांच्या हॉटेल समोर दुचाकीवर बसताना पाहून दोघे ही आजी जवळ गेले. खात्री करून धुळे टीमने आजींना सुखरूप नातवांच्या ताब्यात दिले.
धुळे जिल्हा युवा क्रांती टीमने केलेले हे कार्य आपल्या संघटनेतील  इतर सदस्य,[पदाधिकारी यांच्यासाठी नक्कीच आदर्शवत व प्रेरणादायी असे आहे. त्यांनी खरोखरच कौतुकास्पद कार्य केले आहे.त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व आदर्शवत कार्याबद्दल युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे, ह.भ.प.नाना महाराज कापडणीस,संचालक गणेशराव आदमने,पश्चिम महाराष्ट्र संघटक डॉ राजेश्वर हेंद्रे, नाशिक जिल्हा अध्यक्ष किशोर कोठावदे,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,प्रा.पत्रकार सुभाष शेटे,पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेलार,पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेशराव आप्पा गायकवाड,खेड तालुका संघटक अंकुशराव आगरकर यांनी युवा क्रान्तीचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद वाणी व त्यांच्या टीमचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *