रस्त्यावर रडत सापडलेला चिमुकला एक तासात आईच्या कुशीत परत – युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या मलठणच्या विलासराव गोसावी यांची तत्परता 

274
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसीत फस्ट शिप्ट साठी दुचाकीवरून आपल्या मलठण गावाकडून कंपनीत कामासाठी निघालेले युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार,ग्राहक व पत्रकार संघटनेचे शिरूर तालुका कार्य तत्पर सदस्य विलासराव गोसावी यांना आज शनिवार दि. २८ ला सकाळी सातच्या दरम्यान एका कंपनीजवळ रस्त्याने रडत व पळत असलेला एक चिमुकला मुलगा आढळून आला.समाज कार्याची नेहमीच आवड व जाण ठेवणारे गोसावी यांनी दुचाकी थांबवली व त्या भेदरलेल्या,घाबरलेल्या छोट्या मुलास उचलून घेतले. त्यांनी ही बाब तात्काळ युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व मार्गदर्शक,समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक,जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांना सांगितली. त्यांनी ही लगेचच रांजणगाव येथील त्यांचे पत्रकार मित्र पोपटराव पाचंगे यांना कल्पना देत त्या चिमुकल्याच्या पालकांचा शोध घेण्याची विनंती केली. पाचंगे यांनी गोसावी यांचेशी संपर्क केला.एव्हाना मुलगा हरविल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली होती. मुलाचे वडील हयात नसल्याने सर्व जबाबदारी आईवर पडलेली त्यातच सकाळीच मुलगा गायब झाल्याची माहिती मिळताच आई पूर्णपणे घाबरली. डबा घेऊन कामावर चाललेली मुलाची आई लगोलग मागे घरी फिरली. मुलाच्या आईसह शेजाऱयांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. हा मुलगा विलासराव गोसावी यांच्याकडे सुखरूप असलेला पाहून आईचा व उपस्थित सर्वांचा जीव भांड्यात पडला. अवघ्या एक तासात चिमुकला परत व सुखरूप मिळाल्याचा आनंद त्या आईच्या चेहऱ्यावर गोसावी व उपस्थितांना स्पष्टपणे दिसत होता. जण सेवेचे व्रत अंगी असलेले विलासराव गोसावी यांनी केलेले हे कार्य इतरांसाठी नककीच अभिनंदनीय,कौतुकास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी असेच आहे. विलासराव गोसावी यांच्या या कार्य तत्परतेला युवा क्रांती सहकाऱ्यांकडून मानाचा मुजरा.
    संघटनेत विविध स्वरूपात प्रामाणिक पणे समाज कार्य,सेवा करणारे विलासराव गोसावी यांच्या सारखे असंख्य कार्यकर्ते असून त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य इतरांपर्यंत पोहचून त्यांना ही प्रेरणा मिळावी ही आशा. गोसावी यांनी कार्य तत्परता दाखवून एक उत्तम व आदर्श उदाहण इतरांसमोर ठेवले आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे, ह.भ.प.नाना महाराज कापडणीस,संचालक गणेशराव आदमने,पश्चिम महाराष्ट्र संघटक डॉ राजेश्वर हेंद्रे, नाशिक जिल्हा अध्यक्ष किशोर कोठावदे,धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद वाणी,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,प्रा.पत्रकार सुभाष शेटे,पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेलार,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास मोरे पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेशराव आप्पा गायकवाड,खेड तालुका संघटक अंकुशराव आगरकर,शिरूर तालुका अध्यक्ष सतीश वाखारे,उपाध्यक्ष संदीप भाकरे,कार्याध्यक्ष विलासराव रोहिले,सदस्य विठ्ठलराव गावडे,सुनील रत्नपारखी,व शिरूर तालुका टीमने विलासराव गोसावी यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *