आमदार किसन कथोरे यांचा ‘ विकासपर्व 19 वर्ष ‘ कार्यक्रम संपन्न ; केंद्रिय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती

609
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार यांच्या आमदारकीला 27 ऑक्टोबर रोजी 19 वर्ष पुर्ण झाले तर त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीस 42 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने विकासपर्व 19 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 1978 साली पहिल्यांदा सागावं गृप ग्रामपंचायत चे सरपंच पद त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, व आता सलग आमदारकीची 19वर्ष या त्यांच्या कारकीर्दीचा आढावा पत्रकार करंदीकर यांनी थेट मुलाखती द्वारे घेताना
 या विकास पर्वाला उजाळा दिला. या कार्यक्रमासाठी मतदार संघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र मुरबाड विधानसभा व भिवंडी लोकसभा यात भाजप पक्षात आमदार किसन कथोरे व केंद्रिय पंचायतराज राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे व यामुळें पक्षात मोठी गटबाजीही पहायला मिळत आहे.
     या गटबाजीची चर्चा सुरू असताना आमदार किसन कथोरे हे केंद्रिय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना शह देण्यासाठीच व्यूह रचना तयार करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर कपिल पाटील यांचे कट्टर समर्थक हे विधानसभेसाठी नवा पर्याय कसा मिळेल याची रणनीती आखताना दिसत आहे. त्यात जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विकास पर्व कार्यक्रमासाठी केंद्रिय पंचायतराज राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांनी हजेरी लावल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या तर यामुळें विवीध चर्चा सुरू झाल्या तर कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा गोची झालेली पहायला मिळाली. या उपस्थिती मुळे खासदार कपिल पाटील यांना निवडणुकीत जिंकायचे असेल तर आमदार किसन कथोरे यांच्या शिवाय पर्याय नाही अशी राजकीय चर्चा ऐकायला येत आहे. आगामी काळात या दोघांमधील संघर्ष वाढतो की दोघांचा समेट होतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांची गोची झालेली पहायला मिळत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *